दिनांक 22 August 2019 वेळ 2:34 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » लाटांचा तडाखा बसलेल्या सातपाटी गावाला शिवसेना आमदार अमित घोडांची भेट

लाटांचा तडाखा बसलेल्या सातपाटी गावाला शिवसेना आमदार अमित घोडांची भेट

SATPATI1वार्ताहर
          बोईसर, दि. १५ : मागील काही दिवसांपासुन कोसळणारा मुसळधार पाऊस व त्यात काल, शनिवारी समुद्राला आलेल्या उधाणाचा पालघर जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावरील अनेक गावांना तडाखा बसला आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी गावातही समुद्राचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. आज, आमदार अमित घोडांसह शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सातपाटी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
          सातपाटीच्या समुद्र किनारी समुद्रात उसळणार्‍या लाटा अडविण्यासाठी धुप प्रतिबंध बंधारा नसल्याने भरतीच्या लाटा किनार्‍यालगत असलेल्या घरांवर जोरदार मारा करत असुन संपुर्ण गावात पाणी शिरत आहे. काल, समुद्राला उधाण आल्याने उंच उसळणार्‍या लाटांमुळे अनेक घरांमध्ये शिरले. दरवर्षी उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरत असल्याने येथील गावकरी हैराण झाले आहेत. सातपाटी सुमद्र किनार्‍यावर धुप प्रतिबंध बंधार्‍याकरिता निधी उपलब्ध आहे. मात्र हा निधी न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. तर आपत्कालीन निधी देखील जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी मंजूर केला असला तरी बंधार्‍याचे काम सुरुच न झाल्याने या पावसाळ्यात तरी या निधीचा उपयोग झालेला नाही. प्रशासनाने शनिवारी उद्भवलेल्या परिस्थितीचा अंदाज    घेऊन आता तरी या प्रश्‍नी लक्ष घालावे व बंधारा बांधावा अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.
            दरम्यान या भेटीत आमदार घोडासह शिवसेना सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनिषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, हर्षदा तरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top