राजतंत्र न्युज नेटवर्क
तारापूर, दि. १५ : कुठल्याही प्रकरची अपेक्षा न बाळगता तसेच कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना अनेक वर्षांपासून येथील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने भरण्याचे काम करणार्या रिक्षाचालक शाहाबुद्दीन खान यांचा पालघर जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत सन्मान करण्यात आला. खान मागील कित्येक वर्षांपासुन ऊन, पाऊस, थंडी अशी कसलीही तमा न बाळगता तसेच कित्येकवेळा दुखापती होऊन देखील शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दाखल घेत जिल्हा परिषदेतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार जेजुरकर, सभापती दामोदर पाटील, दर्शना दुमाडे, धनश्री चौधरी तसेच सर्व सदस्यांनी व खाते प्रमुखांनी खान यांच्या कार्याची स्तुती केली.
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : जिल्हा परिषदेतर्फे रिक्षाचालक शाहाबुद्दीन खान यांचा सन्मान