दिनांक 21 September 2019 वेळ 6:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बोईसरकर हैराण,

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बोईसरकर हैराण,

चित्रालय रस्त्याला तलावाचे स्वरुप!

छायाचित्र : वैदेही वाढाण

छायाचित्र : वैदेही वाढाण

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : बोईसर-तारापूर रस्त्यावर असलेल्या चित्रालय व सिडको भागातील रस्त्यांवर मोठं-मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरुन प्रवास करताना बोईसरकरांचे माठे हाल होत आहेत. थोडा जरी पाऊस पडला तरी या खड्ड्यांमध्ये पाणी भरुन रस्त्याला तलावाचे स्वरूप आलेले पहावयास मिळते.

सालवड ग्रामपंचायती अंतर्गत मोडणार्‍या चित्रालय भागात शॉपिंग सेंटर असल्याने तसेच एमआयडीसी, बीएआरसी कॉलनी व टॉप्स कॉलनीकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने येथे नेहमीच नागरीकांसह वाहनांची वर्दळ असते. तर सिडको हा भाग बोईसर-चित्रालय रस्ताच्या मध्यभागी मोडत असल्याने असंख्य नागरीक येथून दररोज प्रवास करतात. मात्र मागील अनेक वर्षांपासुन येथील रस्त्यांवर मोठं-मोठे खड्डे पडत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करत येथून वाहने हाकावी लागत आहेत. थोडा जरी पाऊस पडल्यास तलावाचे स्वरुप येत असल्याने या रस्त्यांवर चालणे देखील कठीण होते. दोन दिवसांपुर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे येथे खडी व गिरीट टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यानंतर झालेल्या पावसात मोठठ्या प्रमाणात गिरीट वाहून गेल्याने परिस्थिती जैसे थे झाली आहे.

बांधकाम विभागातर्फे बोईसर ते तारापूर रस्त्यासाठी निधी मंजूर आहे. त्यानुसार तारापूर ते परनाळीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण देखील झाले. तर बोईसर ते एसटी डेपोपर्यंतच्या रस्त्याचे नुकतेच काँक्रीटीकरण झाल्याने दुसर्‍या टप्प्यात पावसापुर्वी यापुढील रस्त्याचेही काँक्रीटीकरण अथवा डांबरीकरण होईल, अशी आशा येथील नागरीक व्यक्त करत होते. मात्र या रस्त्याच्या कामाला मुहुर्तच न मिळाल्याने नागरीकांच्या आशेवारे पाणी पडले. दरवर्षीच या रस्त्यांची दयनिय अवस्था होत असल्याने कायमस्वरूपी यावर उपाय करणे अपेक्षित असताना बांधकाम विभागामार्फत मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात तरी या रस्त्याचे डांबरीकरण होईल का? असा संतप्त सवाल बोईसरकरांकडून विचारला जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top