दिनांक 26 May 2020 वेळ 8:33 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

BOISAR MULGA MRUTYUवार्ताहर
           बोईसर, दि. 11 : ट्युशन क्लासेसच्या नावाखाली भरपावसात विहिरीत पोहण्यासाठी उतरलेल्या 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बोईसर येथे घडली असुन राकेश यादव असे सदर मुलाचे नाव आहे.
           न्यू राऊत वाडी येथे राहणारा राकेश यादव हा आदर्श विद्यालयात 8 वी इयत्तेत शिक्षण घेत होता. काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे शाळेला सुट्टी असताना तो ट्युशन क्लासेससाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र ट्युशन संपवून तो घरी न जाता चित्रालय येथील म्हाडा सोसायटी भागात असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी उतरला. दुर्दैवाने पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी घराबाहेर पडलेला आपला मुलगा घरी परतला नसल्याने कुटूंबियांनी त्याची शोधाशोध केली असता विहिरीशेजारी राकेशचे दप्तर व कपडे आढळून आले. पोलीसांना याबाबत माहिती दिल्यानंतर तारापूर एमआयडीसी अग्निशमन दल व टॅप्समधील अग्निशमन दलाच्या जवानांकडून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र विहिरीत गाळ असल्याने मृतदेह हाती लागणे कठीण झाले होते. अखेर सालवड ग्रामपंचायतीचे सदस्य कृष्णा जाधव व ग्रामसेवक बागुल यांनी पाणी उपसण्याचे 9 यंत्र मागवून विहितील पाणी उपसा केल्यानंतर संध्याकाळी 5 च्या सुमारास राकेशचा मृतदेह हाती लागला. बोईसर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top