दिनांक 25 May 2020 वेळ 1:05 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन

रासायनिक खतांची खरेदी करताना काळजी घ्या, प्रशांसनाचे आवाहन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 
             पालघर, दि. 10 : खरीप हंगामात पिकांसाठी रासायनिक खते खरेदी करताना शेतकर्‍यांनी अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रांतून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणार्‍या अधिकृत ग्रेडच्या खत खरेदीस प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्री होत असलेल्या ठिकाणाहून खत खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
            खत खरेदी करताना घ्यावयाची दक्षता  –   राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्त्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून सदर कामासाठी राज्यात 1,131 खते, बियाणे, कीटकनाशके निरीक्षकांची नेमणूक केली आहे. शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या खताची रितसर पावती घ्यावी तसेच ती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. खतात भेसळ असल्याची शंका दूर करण्यासाटी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी.
केंद्र किंवा राज्य शासनाने मंजूर केलेल्या खतांच्या ग्रेडसारखी दिसणारी, अनुकरण व नक्कल केलेल्या खतांची खरेदी करण्यात येऊ नये. खताच्या बॅगवर त्यामध्ये असणार्‍या रासायनिक घटक, मूलद्रव्याचे प्रमाण नमूद केलेले असणे बंधनकारक आहे, त्याची खातरजमा करण्यात यावी. (उदा. डी.ए.पी. रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण 18 टक्के व स़्फुरदचे प्रमाण 46 टक्के असेल तसा मजकुर बॅगवर छापलेला असल्याची खात्री करावी.) खताच्या बॅगवर लिहिलेला मजकूर नीट वाचून, खात्री करुन विक्रेत्यांशी चर्चा करून शंका समाधान झाल्यानंतरच खत खरेदी करावी.
            डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करुन ऑरगॅनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जाऊन शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रकारची खत विक्री ही खत नियंत्रण आदेश 1985 या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी असा प्रकार निदर्शनास येत आहे, त्याठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
           डी.ए.पी व पोटॅश युक्त खते खरेदी करताना शेतकर्‍यांनी वरील दक्षता घ्यावी तसेच दिशाभूल करणार्‍या खतांची विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्यास तात्काळ नजिकच्या पंचायत समिती, कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

comments

About Rajtantra

Scroll To Top