दिनांक 17 February 2020 वेळ 1:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » देवबांध, गणेशवाडी व हनुमान टेकडी मागील दहा दिवसांपासून अंधारात

देवबांध, गणेशवाडी व हनुमान टेकडी मागील दहा दिवसांपासून अंधारात

>> विद्युत रोहित्र दुर्मिळ  >> महावितरणचे दुर्लक्ष  >>अंधारयात्रा कायम

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 11 : मोखाडा तालुक्यातील प्रसिध्द अशा देवबांध आणि परिसरातील गणेशवाडी व हनुमान टेकडी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने येथील विद्युत पुरवठा मागील दहा दिवसांपासून अनियमीत काळासाठी खंडीत झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत वारंवार मागणी करूनही महावितरण दखल घेत नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
श्रीसुंदर नारायण गणेश संस्कार देवबांध केंद्राचे व्यवस्थापक वसंत साठे (काका) यांनी महावितरणच्या पालघर कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विद्युत रोहित्राची मागणी नोंदविली असता पालघर येथे विद्युत रोहित्र उपलब्ध नसल्याने स्वखर्चाने वापी (गुजरात) येथून विद्युत रोहित्र घेऊन येण्याची समज साठे यांना देण्यात आली आहे. अशा प्रकारे पदरमोड करण्याची तयारी साठे यांनी दाखवूनही महावितरणकडून त्याबाबत कमालीची चालढकल केली जात असल्याचे साठे यांनी सांगितले आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला वादळ-वार्‍यामुळे तालुक्यातील असंख्य गाव-पाड्यांना सलग किंवा अंतराने अंधाराशी सामना करावा लागत असतो. कमकुवत पोल, जिर्ण विद्युत वाहिन्या यामुळे महत्वाच्या हमरस्त्यावरील गावांनाही खंडीत विजपुरवठ्याचा फटका बसत असतो. पावसाळ्यात सरपटणार्‍या प्राण्यांचा या भागात मुक्त संचार असतो. त्यामुळे असंख्य आदिवासी बांधवांच्या जिवावर बेतलेले आहे. परंतू बळजोरीने थकीत देयके वसूली करणारे महावितरण देखभाल दुरूस्तीबाबत कमालीचा सुस्तपणा दाखवित असल्याने तालुक्यातुन नाराजीचा सुर उमटत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top