दिनांक 24 February 2020 वेळ 6:45 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » आता विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्त्वाचे पाऊल

आता विवाह नोंदणी ऑनलाईन करणे बंधनकारक, नोंदणी व मुद्रांक विभागाचे महत्त्वाचे पाऊल

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
           पालघर, दि. १० : नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विवाह नोंदणी घरबसल्या ऑनलाईन करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता विवाहउत्सुक मंडळींना विवाहाच्या नोंदणी प्रक्रियेसाठी आपला वेळ दडवण्याची गरज नाही.
          त्यासंदर्भात नोंदणी उप महानिरीक्षक आणि कोकण विभागाचे मुद्रांक उपनियंत्रक अ. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार आता १ ऑगस्ट पासून विवाहाची नोटीस केवळ ऑनलाइनच स्वीकारण्यात येणार आहे. विशेष विवाह नोंदणीकरिता सध्या वर आणि वाढू यांना विवाह अधिकाऱ्याकडे नोटीस डेनेव्ह विवाह संपन्न करणे, अशा दोन कारणांसाठी प्रत्यक्ष जावे लागते. त्यांपैकी पहिली म्हणजे नोटीस देण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०१७ पासून ऑनलाईन पूर्ण करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून हि प्रक्रिया केवळ व ऑनलाइनच करणे आता नव्या निर्णयानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. विवाहोत्सुकांना www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर हि नोंदणी करता येणार आहे.
              प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात एक दुय्य्म निबंधकास या जिल्ह्यासाठी विवाह अधिकारी घोषित करण्यात आले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पुणे या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विवाह अधिकारी आहेत. या विभागाने दस्त नोंदणी प्रमाणेच विशेष विवाह नोंदणी प्रक्रिया देखील संगणीकृत केली आहे. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर आवश्यक ती माहिती संगणकात भरण्यात पक्षकारांच्या वेळ वाया जाऊ नये किंवा चुका होऊ नये म्हणून आपली डाटा एंट्री आपणच करण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे.

असा होतो विवाह अधिकारी कार्यालयात विवाह
विशेष विवाह कायद्याप्रमाणे विवाह इच्छुक वर आणि वधू सर्व पुराव्याच्या कागद्पत्रानिशी विवाह अधिकारी कार्यालयात येऊन नोटीस देतात. यात वय, रहिवासी, अशी कागदपत्रे असतात. या नोटिशीची प्रत नोटीस बोर्डावर लावण्यात येते. ३० दिवसाच्या आत नियोजित विवाहाबाबत आक्षेप न आल्यास त्यानंतरच्या ६० दिवसात वर वधू साक्षीदारांना घेऊन विवाह अधिकारी यांच्यासमोर हजर रहातील आणि मग त्यांचा विवाह लावण्यात येईल व प्रमाणपत्र देण्यात येईल.

comments

About Rajtantra

Scroll To Top