दिनांक 21 May 2019 वेळ 12:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूकरांची सर्व धर्म समभाव मदत

डहाणूकरांची सर्व धर्म समभाव मदत

 

छायाचित्र : शिरिष कोकिळ

शिरिष कोकिळ / डहाणू , दि. 11: 10 जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतुक व्यवस्था पूर्णतः बंद झाली होती. रेल्वे वाहतुक बंद झाल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू अशा वेगवेगळ्या स्थानकात उभ्या राहिल्या होत्या. पहाटे 7 वाजल्यापासुन डहाणु रेल्वे स्थानकात भावनगरकडुन वांद्रे टर्मिन्सला जाणारी जलद गाडी उभी करण्यात आली होती. अनेक तासांपासुन खोळंबलेल्या या गाडीतील आबालवृद्ध प्रवासी व महिला काही सोय होईल या अपेक्षेने प्लॅटफॉर्मवर जागोजागी बसून होते. अधून मधून येणार्‍या पावसाच्या जोरदार सरींमुळे प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत होती. तर काही प्रवाशांनी डहाणू रेल्वे स्थानकाच्या बाहेर गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी व पोलीस निरीक्षक परबकर यांनी पूरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन स्वतः परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. तहसीलदार राहुल सारंग, रेल्वे पोलीस सेवेतील पोलीस निरीक्षक वसंत राय, राज्य परिवहन मंडळाचे डहाणू आगार व्यवस्थापक देखील जातीने उपस्थित होते.

DAHANU PRAVASHI MADAT1डहाणु रेल्वे प्रशासन, डहाणु रेल्वे पोलीस व डहाणु पोलीस स्टेशन यांच्यासह डहाणू रोटरी क्लब, डहाणु जैन सोशल ग्रुप यांसह अनेक समाजसेवी संस्था, राजकीय पक्षाचे नेते यांच्यातर्फे प्रवाशांची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच जैन मंदिरात निवारा देखील उपलब्ध करुन देण्यात आला. त्याशिवाय प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था देखील पुरविण्यात आली. प्रवाशांच्या सोईसाठी राज्य परिवहनतर्फे ठाणे, बोरिवली, चारोटी, बोईसर व उंबरगावसाठी विशेष बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या. रिलायन्स एनर्जी आणि क्रेडो स्कूल यांनी देखील स्वतःच्या बसेस उपलब्ध करुन दिल्या. तर काही प्रवाशांनी खाजगी वाहनाने ईच्छीत स्थळी जाणे पसंत केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top