टीडीसी बँकेच्या जव्हार शाखेत तीन दिवसांपासून व्यवहार ठप्प

0
11

IMG-20180710-WA0121मनोज कामडी / जव्हार, दि. १० : शहरातील गरिबांसाठी असलेली एकमेव ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जव्हार शाखेत गेल्या तीन दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद असल्याने, बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा ग्रामीण भागातील गरिब ग्राहकांना चांगलाच फटका बसला असून मागील तीन दिवसापासून पाण्यापावसात बँकेबाहेर व्यवहार सुरु होण्याची वाट बघूनग्राहकांना घरी परतावे लागत आहे.                                                                                                               जव्हार टीडीसी बँकेतील इंटरनेट सेवा गेल्या तीन दिवसापासून बंद असल्याने बँकेतील सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. या बँकेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी व खेड्यापाड्यातील नागरिकांचे खाते आहे. शेतकरी वर्गाने घेतलेले पीक कर्ज तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार याच बॅंकेत वर्ग होतात. तसेच तहसीलदार कार्यालयाकडून वयोवृद्ध नागरिक, निराधार महिला, जेष्ट नागरिक तसेच पेशंनधारक नागरिकांची रक्कम याच बँकेत जमा केली जाते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, वयोवृद्ध, निराधार महिला तसेच इतर गोरगरीब खातेदार आपल्या विविध कामांसाठी दिवसभर बँकेबाहेर रांगेत ताटकळत उभे असतात. मात्र मागील तीन दिवसांपासून बँकेत इंटरनेट सेवाच बंद असल्याने अशा खातेदारांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. यात विशेषतः वयोवृद्ध नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे.                                                                                       याबाबत टीडीसी बँक कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता, बँकेला इंटरनेट सेवा पुरविणारी बीएसएनएलची लाईन बंद असल्याने बँकेतील सर्वच व्यवहार बंद असल्याचे उत्तर देण्यात आले. 

Print Friendly, PDF & Email

comments