दिनांक 21 May 2019 वेळ 12:42 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » उमरोळी येथे संतप्त प्रवाशांकडून रोलरोको

उमरोळी येथे संतप्त प्रवाशांकडून रोलरोको

UMROLI RAILROKOवैदेही वाढाण/बोईसर, दि. 11 : काल, मंगळवारी अतिवृष्टीमुळे संपुर्ण दिवस रेल्वे सेवा ठप्प होती. आज, दुसर्‍या दिवशी देखील रेल्वेसेवा पुर्ववत न झाल्याने उमरोळी रेल्वे स्थानकात चाकरमान्यांसह इतर प्रवाशी खोळंबले होते. सकाळी लोकलसेवा विस्कळीत असताना लांब पल्ल्यांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने धावत होत्या. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी एकत्र येत लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उमरोळी स्थानकात थांबा द्यावा, या मागणीसाठी जम्मू तावी एक्स्प्रेस रोखून धरली होती. यावेळी  डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या महेश पाटील यांनी पालघर येथील रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क साधून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेल्वे अधिकार्‍यांकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उमरोळीत थांबा देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हा रेल रोको मागे घेण्यात आला.

comments

About Rajtantra

Scroll To Top