दिनांक 23 February 2019 वेळ 8:04 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पाणी साठून जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी पाणी साठून जनजीवन विस्कळीत

IMG-20180710-WA0036वैदेही वाढाण / बोईसर, दि. १० : मागील ४ – ५ दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने पालघर जिल्हयात धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी साठल्याने त्याचा रस्ता व रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
           पालघर जिल्ह्यात पाणी साठलेणे राममदिराजवलील भाग पूर्ण पाण्याने भरला आहेत तर केळवे येथे प्रसिद्ध शितला देवीच्या मंदिरामध्ये देखील पाणी शिरले. केळव्यातील मोरपाडयालापावसाचा जबर तडाखा बसला असून हा संपूर्ण पाडा पाण्याने वेढला आहे. बोईसर बेटेगाव येथे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठल्याने या रस्त्यावरील वाहतुक अनेक तास ठप्प झाली होती. तर रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांच्या अडचणीत आणखी भर घालत होते. 
तारापूर चिंचणी येथील लहान मोरी वरून पाणी वाहत असल्याने बायपास रोडवरील वाहतुक ठप्प झाली होती. तर चिंचणीमध्ये देखील अनेक गावात पाणी शिरले. उनभाट व उच्छेळी या ठिकाणी देखील पाणी शिरले. तर तारापूर एमआयडीसी मध्ये देखील ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कामगारांना कामावर जाणे व वाहने चालवणे कठीण होऊन बसले .

comments

About Rajtantra

Scroll To Top