दिनांक 23 February 2019 वेळ 8:22 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर : पावसाच्या संतत धारेमुळे लालोंडे गावात घराचा भाग कोसळला

मनोर : पावसाच्या संतत धारेमुळे लालोंडे गावात घराचा भाग कोसळला

IMG-20180708-WA0010नाविद शेख / मनोर, दि. ८ : पावसाच्या संततधारेमुळे मनोर नजीकच्या लालोंडे गावातील सुमन दत्तात्रेय पडवळे यांच्या राहत्या घराचा एक भाग आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कोसळला. घर धोकादायक झाल्यामुळे या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे
         मनोर परिसरात आजही पावसाची संततधार सुरु आहे. त्यातच रविवारी दि. ८ पहाटे ५ वाजताच्या सुमारास आलेल्या वारा आणि पावसामुळे ललोदे गावच्या गावठाण पाड्यातील सुमन दत्तात्रेय पडवळे यांच्या राहत्या घराचा काही भाग अचानक कोसळला.घराची पडझड सुरु होताच प्रसांगावधान राखत घरातील सर्व माणसे घराबाहेर पडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही दुखापत झाली नाही. या नैसर्गिक आपत्तीमुळे सुमन पडवळे यांच्या घराचे नुकसान झाले असून हे कुटुंब बेघर झाले आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील यांनी केली आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top