दिनांक 19 September 2018 वेळ 11:01 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार : बाबा आमटे विचार मंच संस्थेतर्फे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जव्हार : बाबा आमटे विचार मंच संस्थेतर्फे विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप

IMG-20180708-WA0261प्रतिनिधी
           जव्हार, दि. ९ : महादान मोहीम अंतर्गत व जेष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकस्थित बाबा आमटे विचारमंथ संस्थेतर्फे तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या छत्रपती शाहू विद्यानिकेतन आयरे शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी संस्थेतर्फे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले व मुलांना वनस्पतीचे महत्व पटवून देण्यात आले. यामध्ये आंबा, काजूच्या विविध वृक्षांसह विविध जंगली वृक्षांचा समावेश आहे. झाडे लागवड केली. या कार्यकमाला संस्थेचे राजेंद्र सोनवणे, किशोर गव्हाळे, मारूती राऊत व सर्व सदस्य तसेच आयरे शाळेचे मुख्याध्यापक के. एम शेवाळे, एस.एस.भामरे, के.एस पगार, बी .एन .भरसट, जी.एन हाके, ए .आर जाधव, पी एस पगार, एस. एन .मगर, व शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top