दिनांक 23 February 2019 वेळ 8:02 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

श्रमजीवी संघटनेचे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

IMG-20180709-WA0023राजतंत्र मीडिया / बोईसर, दि. ९ : राज्यासह देशभरात मागास दलित व आदिवासीवरील अत्याचार सर्रास वाढल्याचा आरोप करत व धुळे जिल्ह्यातील राईन पाडा येथील डवरी गोसावी पंथाच्या पाच जणांची मुले पळणारी टोळी समजून निर्दयीपणे ठेचून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा येथील तहसील कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकदिवसीय लाक्षणीक उपोषण केले.
              माणुसकीच्या अभावामुळे समाजामध्ये अराजकता निर्माणहोण्यास वेळ लागणार नाही. श्रमजीवी संघटनेने नेहमीच. माणुसकीला प्राधान्य दिले आहे. आणि यापुढेही माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी श्रमजीवी सदैव लढत राहील, असे मत श्रमजीवींचे संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार विवेक पंडित यांनी यावेळी व्यक्त केले. समाजात घडणाऱ्या अमानवीय घटना, समाज प्रबोधन करणाऱ्या विचारवंतांच्या हत्या, महिलांवरील वाढते अत्याचार व जातीय धार्मिक तणावाच्या निषेधार्थ आज सर्व तहसील कार्यालयासमोर हे एक दिवसीय उपोषण आयोजित केल्याचे सांगतानाच हे उपोषण कोण्या एका सरकारच्या, पक्षाच्या किंवा जाती धर्माच्या विरोधात किंवा समर्थनार्थ नसून केवळ माणुसकीचे समर्थन करणारे आहे असेही पंडित म्हणाले. तर आपला देश हा धर्म निरपेक्ष विचार सरणीचा आहे, सर्व धर्म समभाव अशी व्यवस्था आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे. समानतेचा संदेश देणाऱ्या विविध संत महात्म्यांचा वारसा आपल्या देशाला आहे. मात्र अश्या आपल्या देशात प्रचंड अस्वस्थता आहे. जातीय धार्मिक तणाव प्रचंड वाढलेला आहे. जातीपातीच्या नावाने समाजात आक्रमकता माजली आहे. कायदा हातात घेणे, कोणालाही शिक्षा करण्याचा अधिकार आपणास आहे हि भावना वाढीस लागणे हे या लोकशाही समाज व्यवस्थेला अत्यंत घातक आहे असे मत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ वारणा यांनी वाडा तहसिल कार्यालयासमोर आयोजित उपोषणादरम्यान व्यक्त केले. 
           समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा तसेच कायदा सुव्यवस्था राखली जावी या दृष्टीने सरकारने योग्य ती उपायय योजना करावी, अशा मुख्य मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱयांमार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले

comments

About Rajtantra

Scroll To Top