दिनांक 23 February 2019 वेळ 8:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » केळव्यातील मोरपाड्याला पाण्याचा वेढा, पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ अडकले.

केळव्यातील मोरपाड्याला पाण्याचा वेढा, पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थ अडकले.

IMG-20180709-WA0053राजतंत्र न्युज नेटवर्क
             बोईसर, दि. ९ : केळवे ग्रामपंचायतीमधील  मोर पाड्यावरची 300 ते 400 वस्ती असलेल्या पाड्याला  सततच्या  पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला असून  बाहेर पडण्यासाठी  एकही पर्यायी  रस्ता नसल्याने उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ गावातच अडकून पडले आहेत.
             संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले मोरपाडा गाव कित्येक वर्षांपासून रस्तासारख्या मूलभूत सोईंपासून वंचित आहे. त्यातच गेल्या ३ ते ४ दिवसापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे हा पाढा चारही दिशानी पाण्याने वेढला असून पाड्यातील नागरिकांना रोजगार निमित्त बाहेर पडणे, तर ३५ ते ४० विद्यार्थ्याना आपली शाळा गाठणे मुश्किल झाले आहे. गावाबाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्याने पाणी ओसरण्याची वाट पहाण्याशिवाय अन्य कोणता पर्याय येथील ग्रामस्थानकडे उरलेला नाही. मोरपाड्यापासून २ किलोमीटर दूर असलेल्या भारणेपाडा येथून वळसा घालून गावाबाहेर पडण्याचा पर्याय असला तरीही मोठी कसरत करून हे अंतर गाठावे लागते. अश्या परिस्थितीत गरोदर माता, कोणी आजारी असल्यास अथवा विषबाधा सारखे प्रकार घडल्यास याच पाण्यातून प्रवास करून रुग्णालय गाठावे लागते
            अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थानकडून ग्रामसडक योजना, आदिवासी उपाययोजना ठक्कर बाप्पा आदिवासी उपाययोजना आदी योजनांच्या माध्यमातून दीड किलोमीटर रस्ता व्हावा अशी मागणी केली जात आहे. मात्र या मागणीकडे कोणताही लोकप्रतिनिधी गांभीर्याने पहात नसल्याने अखेर या पाड्याचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. .

comments

About Rajtantra

Scroll To Top