दिनांक 23 February 2019 वेळ 9:06 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » 12 जुलै पर्यत अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पालघर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

12 जुलै पर्यत अतिवृष्टीच्या इशाऱ्याने पालघर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 
            पालघर दि. ८ :- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. 
12 जुलै पर्यत जिल्हयात पावसाचा जोर कायम  असल्याने जिल्हयातील काही ठिकाणी पुरपरिस्थती निर्माण होण्याची शक्याताआहे. समूद्र खवळलेल्या स्थितीमध्ये राहणार  आहे.त्यामूळे समूद किनाऱ्यालगतच्या,खाडी किनाऱ्या लगतच्या नदी  किनाऱ्यालगतच्या व दरडग्रस्त सखल भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.     
पुरपरिस्थतीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी
जिल्हयात १२ जुलै पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे याची सर्व नागरिंकांनी नोंद घ्यावी.  , जोराचा पाऊस  असल्यास किवा नदी नाल्या खाडया ,रस्यावरील पुल ,साकव अशा ठिकाणी पुरपरिस्थती निर्माण झाल्यास सदर ठिकाणी  जाणे टाळवे.  पावसाच्या परिस्थितीमध्ये  घरामध्ये राहणे , पुराच्या पाण्यात जर कोणी व्यक्ती अडकली असेल तर सदरची माहिती  संबधित नियंत्रण कक्षास कळवावे, जिल्हयातील  पर्यटन स्थळे  जसे की धबधबे,समुद्रकिनारे , डोंगर टेकडया अशा ठिकाणी जाणे टाळावे जिवितास धोका  होवू  शकतो.,पर्यटनासाठी गेल्यास  अतिधोकादायक  ठिाकणी  जावून सेल्फी काढू नये,, प्रशासनाकडुन  वेळोवेळी  केलेल्या सुचंनाचे पालन करावे
जिल्हयात कुठेही पुरपरिस्थत किंवा नैसर्गिे आपत्ती आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा
पालघर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष 02525-297474
श्री. विवेकानंद कदम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – 9158760756/8329439902
पालघर तहसिल नियंत्रण कक्ष  –  02525-254930
डहाणू तहसिल नियंत्रण कक्ष –  028528-221182
तलासरी तहसिल नियंत्रण कक्ष –  02521-220018
वसई तहसिल नियंत्रण कक्ष  – 0250-2322007
मोखाडा तहसिल नियंत्रण कक्ष  – 02529-256826
विक्रमगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02520-240925
जव्हार तहसिल नियंत्रण कक्ष  – 02520-222426
वाडा तहसिल नियंत्रण कक्ष –  02526-271431

comments

About Rajtantra

Scroll To Top