दिनांक 19 February 2019 वेळ 4:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » नादुरुस्त रस्त्यांसाठी श्रमजीवीचा रास्तारोको, कुडूस नाक्यावर दीड तास रोखला रस्ता

नादुरुस्त रस्त्यांसाठी श्रमजीवीचा रास्तारोको, कुडूस नाक्यावर दीड तास रोखला रस्ता

IMG-20180705-WA0093दिनेश यादव
            वाडा, दि. ५ : तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांविरोधात आज श्रमजीवी संघटनेने कुडूस नाका येथे तब्बल दीड तास रास्ता रोखून आंदोलन केले. संबंधितांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेण्यात टाळाटाळ केल्याने आज श्रमजीवी संघटना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन करून सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्तावर बसवून जनतेसमोर जाब विचारण्यात आला व त्यांनंतर कालबद्ध दुरुस्ती कार्यक्रम ठरवून लेखी घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
            भिवंडी वाडा मनोर या रस्त्याचे काम बीओटी तत्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले होते. या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याबाबत वारंवार मागण्या करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याने आज या विरोधात श्रमजीवी संघटनेने जोरदार आंदोलन करत प्रशासन आणि सुप्रीम कंपनी यांना चांगलेच धारेवर धरले. भर रस्त्यात सगळ्या अधिकाऱ्यांना खाली बसवून जाब विचारण्यात आला.यावेळी सर्व नादुरुस्त रस्त्याची ठिकाण कोणत्या कालावधीत किती मुदतीत करणार याबाबत कालबद्ध कार्यक्रम लेखी स्वरूपात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
              ज्यांची स्वतःची वाहन नसताना स्वतःची एक दिवसाची मजुरी मोडून संघटनेचे सभासद सामाजिक बांधिलकी जपून या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हा प्रमुख प्रमोद पवार यांनी केले, यावेळी जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, तालुका सचिव सरिता जाधव, कामगार संघटना तालुका प्रमुख रवी चौधरी, शेतकरी घटकाचे मिलिंद थुळे, राजू जाधव, बाळाराम पडोसा, मनोज काशीद, दामोदर डोंगरे, दिलीप चौधरी, इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाछापूरे, सुप्रीम कंपनीचे चे झेड एम शेख,पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा केली श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले.

 

comments

About Rajtantra

Scroll To Top