दिनांक 23 February 2019 वेळ 8:01 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मधमाशी पालन उद्योग प्रशिक्षणासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

मधमाशी पालन उद्योग प्रशिक्षणासाठी इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
              पालघर, दि. ४ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळामार्फत आग्या व सातेरी मधमाशीपालन उद्योग करु इच्छिणार्‍या मधपाळ लाभार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी ५ ते १० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असुन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता ठाणे जिल्ह्यातील शहापुर, मुरबाड व पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील मधमाशीपालन उद्योग करण्यास इच्छुक असणार्‍या मधपाल लाभार्थीनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान या लाभार्थ्यांची राहायची व जेवणाची सोय मंडळामार्फत करण्यात येणार आहे.
            मध उद्योग करण्यास इच्छुक असणार्‍या मधपाळ लाभार्थ्याला कमीत कमी 5 व जास्तीत जास्त १०० मधपेट्या तसेच १ मध यंत्र घेणे बंधनकारक आहे. त्याकरीता पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जाद्वारे अर्थसहाय्य मंजूर केल्यास मंडळामार्फत सामान्य वर्गातील लाभार्थ्यास प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के व एससी, एसटी व ओबीसी वर्गातील लाभार्थ्यास 35 टक्के रक्कमेचे अनुदान मधपेट्या खरेदी करण्यासाठी वस्तुस्वरुपात देण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.
            तसेच कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर प्रत्येकी २ सातेरी रिकाम्या मधपेट्या खरेदी करण्यासाठी वस्तुस्वरुपात अनुदान देण्यात येणार आहे. तर शासनाच्या मानव विकास मिशन योजनेअंतर्गत इच्छूक लाभार्थ्यास १०० टक्के अनुदान स्वरुपात साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ जिल्हा कार्यालय, लक्ष्मी विष्णू सदर, महर्षी कर्वे रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) या कार्यालयाच्या ०२२ – २५३६६०७५ दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त गरीब व गरजू आदिवासी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामद्योग अधिकारी (ठाणे) यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top