दिनांक 23 April 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

1प्रतिनिधी :
                 केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजने अंतर्गत कुडूस येथे बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित तरुणांना उद्योग सुरु करण्यासाठी बँकेद्वारे मिळणार्‍या अनुदानाच्या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
                 कुडूस ग्रामपंचायतीच्या सभागृहात या बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दिप प्रज्वलना नंतर प्रास्ताविकातून सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा यांनी मेळाव्याचा हेतु विषद केला. तर उपस्थित बेरोजगारांना जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतिश भामरे यांनी मार्गदर्शन केले. भामरे यांनी सांगितले की, आपला प्रोजेक्ट हा बँक अधिकार्‍यांना योग्य वाटेल असा व शासकीय योजनेत समाविष्ट असणारा असावा. आमच्याकडे ज्या सवलती मिळतात त्या इंडस्ट्रीयल उद्योगासाठी असतात. अन्य बँक लोन तुम्हाला मिळेल मात्र त्यात अनुदान मिळणार नाही, असे सांगून भामरे पुढे म्हणाले, उद्योगासाठी तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. जर 20 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर सबसिडी मिळते. महिला उद्योजकांसाठी जास्त सवलती मिळतात. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जेथे महिला औद्योगिक धोरण जाहीर केले आहे. तर वाडा तालुका हा राज्यात औद्योगिक कारखानदारी असणारा पहिला तालुका आहे, असे भामरे म्हणाले.
            मात्र भामरे यांनी दिलेल्या माहितीनंतर शासकीय कर्जाची सुविधा फक्त मोठ्या उद्योगानांच मिळेल असे समजल्याने छोट्या धंद्यात आपले बस्तान भक्कम बसावे म्हणून प्रोत्साहनपर भांडवल या रोजगार मेळाव्यातून मिळेल या आशेने आलेले तरूण नाराज झाले.
           या मेळाव्यातून झालेल्या चर्चेत मुस्तफा मेमन, स्वप्नील जाधव व काही उपस्थितांनी भाग घेऊन शंकानिरसन करून घेतले. मेळाव्यासाठी तरूण, तरूणी व महिला उपस्थित होत्या. मेळावा यशस्वी व्हावा म्हणून वाडा विकास समितीचे ईरफानभाई सुसे, मुस्तफा मेमन, रफीक मेमन, होती पाटील, श्रीकांत भोईर, डॉक्टर गिरीश चौधरी व सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली. कुडूस ग्रामपंचायतीच्या वतीने अल्पोपहार व बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
           यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, तालुका औद्योगिक निरीक्षक यु. जी. माने, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा, गोविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top