दिनांक 23 February 2019 वेळ 8:21 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » केळव्याच्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून डहाणू लोकलला लागलेली आग विझवली

केळव्याच्या तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून डहाणू लोकलला लागलेली आग विझवली

IMG-20180704-WA0013वार्ताहर 
           बोईसर, दि. ०४ : विरार येथे रेल्वे स्थानकात काल मंगळवारी शॉर्टसर्किट मुळे चर्चगेट – डहाणू लोकलला आग लागण्याची घटना घडली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर हि आग विझवण्यात आली. मात्र ह्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्याकामी धावून आलेला केळव्याचा एक तरुण देवदूत ठरला. दिलीप मोतीराम भोईर असे या तरुणाचे नाव आहे.
काल अंधेरी येथे पूल कोसळल्याने चर्चगेटहुन सुटणारी डहाणू लोकल बोरिवली स्थानकातून सोडण्यात आली. बोरिवली येथे सेफ्टी मॅक्स फायर इंजिनिअरिंग येथे काम करणारे दिलीप भोईर याच लोकलने प्रवास करीत होते. ही लोकल संध्याकाळच्या सुमारास विरारच्या फ्लॅट क्रमांक ४ वर आली असता अचानक लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन लोकलला मोठी आग लागली . आगीचे रौद्र रूप पाहून कोणीच पुढे जाऊन विझविण्याचे धाडस  करत नव्हते. या ठिकाणी ३० च्या वर पोलीस कर्मचारी प्रवासी व घटनास्थळापासून प्रवाश्याना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होते काही वेळातच घटनास्थळी रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेले अग्निशमन यंत्र आणण्यात आले मात्र हे यंत्र चालविण्याचे प्रक्षिक्षण नसल्याने पोलीस व रेल्वे कर्मचारी हतबल झाले. अश्या परिस्थितीत अग्निशामक दलाच्या उपकरणांशी संबंधित क्ष्रेत्रात काम करणाऱ्या दिलीप भोईर यांनी प्रसंगावधान राखून व स्वताचा जीव धोक्यात घालून सहा सिलेंडरच्या सहाय्याने आग विझवण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली. या आगीवर वेळेत नियंत्रण नसते मिळवले तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे भोईर यांच्या या कामगिरीचे उपस्थितांनी कोयीतूक करून आभार व्यक्त केले.
दरम्यान, विरारसारख्या वर्दळ असलेल्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याने कालच्या घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळे प्रवाश्याच्या सुरक्षेचा प्रसन्न ऐरणीवर आला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top