दिनांक 18 April 2019 वेळ 8:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भुसारा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी सुनिल भुसारा.

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
             जव्हार, दि. ०४ : जव्हार- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी सुनील भुसारा यांची दुस-यांदा निवड करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन कार्यकारणी लवकरच तयार करण्यात येणार आहे. नवीन जिल्हा कार्यकारिणीमध्ये तरुण व एकनिष्ठपणे पक्षाला वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश जिल्हा कार्यकारणीमध्ये घेतला जाईल असे भुसारा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील व विधिमंडळ गटनेते अजित दादा पवार राज्य निवडणूक अधिकारी वळसे पाटील तसेच ठाणे व पालघर जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हा निरीक्षक संजय वढावकर आणि जिल्ह्याचे आमदार आनंदभाई ठाकुर यांच्या सहमतीने सुनिल भुसारा यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे प्रभारी लोकनेते गणेश नाईक व आमदार आनंद भाई ठाकूर व जिल्हा निरीक्षक संजय वडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरात नवीन कार्यकारिणीे जाहीर करण्यात येईल असे भुसारा यांनी यावेळी सांगितले.
मोखाडा आणि विक्रमगड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी असून . पक्षाचे जिल्ह्यात ३४ नगरसेवक, ५ जिल्हा परिषद सदस्य, १ जिल्हा बँक संचालक व १० पंचायत समिती सदस्य आहेत. मागील काही काळात पक्षापासून दूर गेलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना शोधून त्यांच्यावर नव्याने जबाबदारी देऊन पक्षात नवचैतन्य निर्माण केले जाणार असून त्याकरिता पदाधिकारी व कार्यकर्ते तन- मन- धनाने कामाला लागतील असा विश्वास भुसारा यांनी व्यक्त केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top