दिनांक 19 February 2019 वेळ 4:46 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जव्हार नगरपरिषद प्रभाग ६ पोट निवडणूक, स्वप्नील औसरकर बिनविरोध

जव्हार नगरपरिषद प्रभाग ६ पोट निवडणूक, स्वप्नील औसरकर बिनविरोध

LOGO-4-Onlineप्रतिनिधी 
             जव्हार, दि. २६ : जव्हार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसेनेचे नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर रीक्त झालेल्या पोटनिवडणुकीत स्वप्नील औसरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारानी आपले अर्ज माघारी घेतल्याने औसरकर हे विजयी ठरले आहेत.
           दिवगंत नगरसेवक अमोल औसरकर यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेने त्यांच्या लहान भावालाच सेनेने उमेदवारी दिल्याने सहानुभूती पूर्व विचार करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न सेनेचे जेष्ठ नेते दिनेश भट यांनी केला. त्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी प्रतिसाद देत आपल्या पक्षाकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तिच भूमिका भाजपनेही घेतली मात्र काँग्रेस व एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडणूकीची शक्यता मावळली होती. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने औसरकरहे बिनविरोध विजयी झाले.

comments

About Rajtantra

Scroll To Top