दिनांक 19 February 2019 वेळ 4:58 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यलयावर धरणे आंदोलन

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आज जिल्हाधिकारी कार्यलयावर धरणे आंदोलन

LOGO-4-Onlineवार्ताहर

               बोईसर : विद्यार्थी, आदिवासी कर्मचारी वर्ग, महिला तसेच स्थानिकांना नोकरीत समावेश करण्यांसह जिल्ह्यातील विविध समस्यांविरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्पल्योईज फेडरेशन आज गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
               पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र या योजना कार्यरत आहेत मात्र या योजना राबविण्यासाठी पुरेसे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे हि बाब शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी तसेच आदिवासीच्या अनेक मागण्या, महिला सक्षमीकरण, विद्यार्थी वस्तीगृह, स्थानिक नोकरी, कर्मचारी पदोन्नती, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन, इतर जातीची होणारी घुसघोरी, आश्रमशाळांतील अडचणी,गुणवत्ता शिक्षण,यांसारखे अनेक प्रश्न घेऊन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आज जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहे. तरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित आंदोलकांना पाठिंबा देण्याचे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष माधव लिलका यांनी केले आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top