दिनांक 23 February 2019 वेळ 8:02 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका – पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका – पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांचे आवाहन

IMG_20180703_122338अशोक पाटील
            वाडा, दि. ३ : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. वाडा तालुक्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तातडीने पोलिस मित्र, शांतता कमिटी, पोलीस पाटील, पत्रकार, व्यापारी व सामाजिक संघटनांची मंगळवारी ( दि. ३ ) बैठक आयोजित केली होती. 
           सोशल मीडिया वरील अशा अफवा पसरविण्याऱ्या गोष्टींवर व अफवांवर विश्वास न ठेवता संशय आल्यास किंवा संशयीत व्यक्ती अढळल्यास तातडीने वाडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले आहे.
समाज माध्यमांवरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्ट प्रसारित करणे, कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविणे, संदेश फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. या गुन्ह्याबद्दल कडक शिक्षा होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

comments

About Rajtantra

Scroll To Top