दिनांक 20 June 2019 वेळ 4:58 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाडा : अजरामर युथ क्लब च्या वतीने सुर्यमाळ केंद्रातील ७४३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

वाडा : अजरामर युथ क्लब च्या वतीने सुर्यमाळ केंद्रातील ७४३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

IMG-20180703-WA0032प्रतिनिधी
             मोखाडा, दि. ३ : तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणा-या सुर्यमाळ जिल्हापरिषद केंद्रातील मौजे आमले, भवानीवाडी,सुर्यमाळ आदी नऊ जि.प.शाळांना अजरामर युथ क्लब संस्थेच्या वतीने संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यांत आलेले आहे. याकामी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र विशे यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यामूळे आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वेध अभ्यास करता येणार आहे.
            कार्यक्रमासाठी अजरामर युथ क्लबचे सर्वश्री हिरेन शहा , चेतन बोरीचा , परेश सावला , दिपाली छडवा , दिशीका बोरीचा यांच्यसह क्लबचे सर्व मान्यवर सदस्य व केंद्रप्रमूख घनःशाम कांबळे , मुख्याध्यापक सचिन बरबडे आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. मोखाडा तालुका हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीत शिक्षणा सारख्या पवित्र कार्यात आपण दिलेला मदतीचा हात अनमोल आहे. त्यामूळे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावेल आणि ते अधिकाधिक प्रमाणांत शिक्षणाकडे उद्यूक्त होतील असे प्रतिपादन केंद्रप्रमूख घनःशाम कांबळे यांनी अजरामर क्लबचे आभार मानतांना केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top