दिनांक 19 February 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप

KISHOR MUSLE TRUST

वैदेही वाढाण/बोईसर, दि. 3 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधे अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये या उद्देशाने किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर तालुक्यातील दहीसर तर्फे मनोर केंद्रातील 10 शाळांतील 800 विद्यार्थ्यांना रेनकोट, तीन हजार वह्या व 100 सायकलींचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार विलास तरे, बीडीओ प्रदीप घोरपडे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जिल्हा परिषद सदस्य जिवन सांबरे, पंचायत समिती सदस्य वैशाली शिंदे, श्रमिक शिक्षण संस्थेचे कार्यवाहक मार्तंड पाटील, सरपंच विद्या लाबड, उप सरपंच रणजित ठाकुर, केंद्रप्रमुख राजेंद्र संखे तसेच इतर मान्यवर हजर होते.

मुसळे प्रकल्प ट्रस्टतर्फे मागील 15 वर्षांपासून हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती देतानाच विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर मुसळे त्यांनी केले. तर किशोर सरांसारखी मंडळी ग्रामीण भागात येऊन विद्यार्थी, बेरोजगार तरूण व महिलांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशिक्षणे व ग्रहउद्योगांच्या माध्यमातुन उद्योजक घडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सहकार्याने आपण आपल्या ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार विलास तरे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी  पार पाडण्यास नावझे ग्रामीण विद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विश्वस्तांनी मोलाचे सहकार्य केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top