दिनांक 14 November 2018 वेळ 11:42 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाबूराव लहांगे यांचे निधन

कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते बाबूराव लहांगे यांचे निधन

IMG-20180702-WA0046प्रतिनिधी 
          वाडा, दि. २: कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते तथा ठाणे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती बाबूराव काशीनाथ लहांगे यांचे रविवार दिनांक १ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
बाबूराव लहांगे हे कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते होते तसेच ते ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून दोन वेळा निवडून आले होते. यामध्ये एक वेळेस त्यांनी समाज कल्याण समितीचे सभापती पदही भूषविले होते. या कालावधीत त्यांनी आदिवासी व इतर समाजाच्या विकासासाठी भरीव काम केले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी समाजातील एक चांगले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी कॉंग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. लहांगे यांच्या पश्च्यात पत्नी, तीन मुले व नातवंडे असा परिवार आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top