दिनांक 19 February 2019 वेळ 3:57 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » वाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

वाडा तालुका कृषि कार्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

IMG-20180702-WA0032प्रतिनिधी
           वाडा, दि. २ : राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असुन काल ठिकठिकाणी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वाडा येथे तालुका कृषि कार्यालयासमोरील कृषि फाँर्ममध्ये  उपविभागीय  कृषि अधिकारी प्रविण गवांदे व कृषि भुषण शेतकरी अनिल पाटील यांच्या हस्ते नारळाची रोपे लाऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
        स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै हा कृषिदिन म्हणुन सर्वत्र साजरा केला जातो. या कृषिदिनाचे औचित्य साधून वाडा पंचायत समितीच्या सभागृहात स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वृक्षरोपण या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. तथा ती आजच्या काळाची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गवांदे यानी यावेळी केले, तर अशा या चांगल्या कार्यक्रमासाठी शासनाचे नियोजन  कुठेतरी कमी पडते व लावलेली पन्नास टक्केही झाडे जगत नाहीत अशी खंत कृषिभुषण शेतकरी यांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी एम.के.हासे, वाडा पंचायत समितीचे कृषि अधिकारी एस.सी.दुमाडा, मंडळ अधिकारी एम.जी.गावडे मँडम,  आर.एस. जगताप व कृषि कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top