दिनांक 19 February 2019 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » दहिसर वनपरिक्षेतत्रात वनमहोत्सवास सुरुवात, आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

दहिसर वनपरिक्षेतत्रात वनमहोत्सवास सुरुवात, आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

IMG-20180702-WA0032प्रतिनिधी 
           मनोर,ता.२ : दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत १३ कोटी वृक्षलागवड महोत्सवाची सुरुवात गुंदावे येथे आमदार विलास तरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करून करण्यात आली.
१ जुलै ते ३१ जुलै पर्यत चालणाऱ्या वनमहोत्सवात दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत ४८ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. बांबू, साग, वावळा, खैर, पळस, करंज, कुसुम, आपटा या जातीच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तर अभियाना अंतर्गत दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतील 12 ग्रामपंचायतींना वृक्षरोपण करण्यासाठी प्रत्येकी १ हजार ६६० झाडाची रोपं उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी उपवनसंरक्षक नानासाहेब लडकत, पालघरचे सहाय्यक वनसंरक्षक बि.ए.पोळ, वनक्षेत्रपाल राजेंद्र सारणीकर, एम.बी.चव्हाण, वनपाल बि.एस.सोनार,बि.पी. सोनार,शिपाई बि.ए.दळवी,दिनेश नाईक,ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top