
वाडा, दि. २ : तालुक्यातील शिक्षण घेत असलेल्या तरुणांनी एकत्र येत ‘धर्मवीर’ या नावाने ग्रुप तयार केला असून या ग्रुपच्या माध्यमातून ही तरुण मंडळी अनेक लहान-मोठे सामाजिक उपक्रम राबवत असतात.
आज तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता या तरुणांनी स्वत:च्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या पैशातून बचत करत पैसे जमा केले. आणि त्यातून जवळपास १०० रेनकोट विकत घेऊन ते वाडा तालुक्यातील बोरशेती, वंगानपाडा, भोकारपाडा ,साखरशेत या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करून ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हासू फुलवण्याचे कार्य केले. या आधीही या तरुणांनी आनाथ मुलांसोबत तीळगुळाचे कार्यक्रर्म, शिवजयंती असे सामाजिक उपक्रम राबवत इतर तरुणांना एक चांगली दिशा देण्याचे कार्य केले आहे.
या रेनकोट वाटप कार्यक्रमासाठी धर्मवीर ग्रुपचे अध्यक्ष – रोहित सोनावणे, शुभम पाटील-सचिव, प्रथमेश ठाकरे राहुल सोनावणे, केतन काळे, राकेश केणे, निखिल ठाकरे, नितिन भोईर, सागर मढवी, अविनाश काळे, योगेश पाटील, रोहन पाटील, अभि ठाकरे, अमित बोडके, सिद्धू पाटील, ओमकार पाटील, निशांत भानुशाली, आनंद ठाकरे, प्रतिक जाधव, निकेत ठाकरे यांसह धर्मवीर ग्रुपच्या इतरही तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले.