जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघ कार्यकारणी निवड

0
425
IMG-20180701-WA0112प्रतिनिधी
         जव्हार, दि. २ : आदिवासींची पारंपरिक कला सण व उत्सव तसेच दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आदिवासी युवा संघाची नव्याने कार्यकारिणी निवड करण्यात आली. या आदिवासी युवा संघ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी म्हणून महेश सखाराम भोये यांची निवड तर उपाध्यक्षपदी एकनाथ दरोडा, मनोज गवते, राहुल घेगड, दिनेश जाधव, संकेत माळगावी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी राजेश कोरडा, जनार्दन ठोंबरे व सचिवपदी व सचिव पदी तुळशीराम चौधरी तर खजिनदार पांडुरंग भरसट व संदीप कनोजा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जव्हार तालुका हा ९५ टक्के आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका असून, दरवर्षी या तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी जागतिक दिन साजरा केला जातो. तसेच इतरही आदिवासींचे सण, उत्सव सतत साजरे केले जातात. आज रविवारी जांभचाळीचा येथील भरसट हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत या कार्यकारिणीचे नियोजन व विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. तसेच आदिवासी युवा संघाची मीटिंग पार पडली. या कार्यक्रमाचे नियोजन व विविध समित्या स्थापन करण्यात आल्या .तसेच मागील वर्षीचा जमा खर्च वाचन करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह माजी युवा अध्यक्ष हेमंत घोगड, गोविंद धांगडा, मनोज कामडी, नरेश मुकणे, गणेश गवळी, प्रदीप चौधरी, चंद्रकांत मुकणे, विकास कनोजा, रजनीकां वड, नरेश कुवरे, प्रवीण अवतार, विनोद मौळे व सर्व युवा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments