दिनांक 19 February 2019 वेळ 3:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मुले चोरणार्‍या टोळींसारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुले चोरणार्‍या टोळींसारख्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/नवी मुंबई, दि. 2 : मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे वाटसरु, प्रवासी व अन्य निष्पाप व्यक्तींचा छळ होतो. त्यामुळे मारहाणीच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी सोशल मिडीयावरील अश्या कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी केले आहे.
अफवा पसरविणार्‍या संशयीतांवर सायबर सेलची कडक नजर असून अशा व्यक्तींवर त्वरीत कार्यवाही करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे. अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन बजाज यांनी केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top