दिनांक 23 February 2019 वेळ 8:33 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यामुळे अपघात, 1 जखमी

वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यामुळे अपघात, 1 जखमी

WADA APGHAT2दिनेश यादव /वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील सापणे हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात आदळल्याने अनियंत्रित झालेला कंटेनर कारला धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

वाडा-मनोर महामार्गावरील सापणे येथील पिंजाळ नदीवरील पुलावर मनोरकडून वाड्याच्या दिशेने येत असलेला जी.जे. 06/व्ही.व्ही. 8864 क्रमांकाचा कंटेनर पूलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आदळल्याने कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व कंटेनर थेट विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.04/जी.झेड. 3379 या क्रमांकाच्या कारला धडकला. यात कारमधून प्रवास करणारे उदय नाईक जखमी झाले असून त्यांना वाड्यातील शर्वरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी-वाडा-मनोर रस्ता पावसाळ्याच्या सुरवातीलाच खड्डेमय झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वाडा-मनोर महामार्गावरील पिंजाळ आणि देहर्जे नदीवरील पुल अपूर्ण असल्याने या नद्यांवरील एकाच पुलावरुन वाहतूक सुरु आहे. त्यातच पिंजाळ नदीवरील पुलावर मोठं-मोठे खोल खड्डे पडत असल्याने दरवर्षी येथे अपघात घडत असतात. मात्र याकडे बांधकाम विभाग आणि या रस्त्याचा ठेका असलेली सुप्रीम कंपनी कानाडोळा करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top