दिनांक 19 February 2019 वेळ 3:40 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघर येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते वृक्षारोपण

पालघर येथे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते वृक्षारोपण


वृक्षारोपण-1राजतंत्र न्युज नेटवर्क

             पालघर, दि.१ : राज्यभरात 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते पालघर वनक्षेत्रातील पडघा हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
            पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणेही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनीच जास्तीत जास्त वृक्षाची लागवड करावी. असे आवाहन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी याप्रसंगी केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वृक्षरोपण आवडीने केले पाहिजे. आपण सर्वांनी देखील कर्तव्य भावनेने आज वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन केले पाहिजे. आज 1 जुलै हा स्व.वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषि दिन म्हणून साजरा केला जातो.असे पालकमंत्री म्हणाले.
          यावेळी व्यासपिठावर पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पालघर नगरपरिषदचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, श्रीमती पिंपळे, पंचायत समिती सदस्य विजय तरे, पडघा गावच्या संरपच निकीताताई, उपवनसंरक्षक नानासाहेब लडकत ,जिल्हाकृषी अधिकारी तरकसे, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी तसेच डहाणू व पालघर वनविभागाचे व सामाजिक वनिकरण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
          यावेळी डहाणू उपवनसरक्षंक नानासाहेब लडकत यानी आपल्या प्रास्तविकात जिल्हयात १ जूलै २०१८ ते ३१ जुलै २०१८ पर्यत सदर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. खासदार गावित यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगल टिकविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरी एकतरी झाड लावावे व जगवावे असे आवाहन केले. यावेळी स्व.वसंतराव नाईक यांनी राबविलेल्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली तसेच बेटी बचाओ व झाडे जगवा असा संदेशही त्यांनी दिला.
         वनविभाग व इतर विभाग आणि ग्रामपंचायती मिळून 1 जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवडीच उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. जिल्हयाचे उद्ष्टि ४३.३६ लक्ष असून प्रत्यक्ष लागवड ५०.२५ लक्ष करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी सागितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top