दिनांक 19 May 2019 वेळ 10:48 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

पालघर बोईसमधील चित्रपटगृहांना मनसेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

IMG-20180701-WA0013वार्ताहर 
              बोईसर, दि. ०१ : चढ्या दराने खादय पदार्थ विक्री करणाऱ्या विविध शहरातील चित्रपटगृहविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येत असून पालघर व बोईसरमधील चित्रपटगृहांना खाद्यपदार्थ योग्य किमतीत विका, बाहेरुन खाद्य पदार्थ आणण्यास परवानगी दया, मोफत फिल्टरचे थंड पाणी उपलब्ध करा, अश्या विविध मागण्यांचे पत्र पालघर जिल्हा मनसेतर्फ़े चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. मनसेचे पालघर तालुका अध्यक्ष समीर मोरे, उप जिल्हा अध्यक्ष अनंत दळवी, उप तालुका अध्यक्ष चेतन संखे, शिवाजी रेमबाळकर, विशाल जाधव, विभाग अध्यक्ष संतोष पिंपळे, विनायक केलुसकर, विनोद भोईर, राजेश शिंदे, नयन मोरे, नवल मोरे, सिद्धार्थ महाले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top