दिनांक 19 February 2019 वेळ 3:39 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का ? – नीलम गोर्हे

पंतप्रधान मोदी पालघरमधील शेतकऱ्यांच्या मन कि बात जाणणार का ? – नीलम गोर्हे


IMG20180630130742वार्ताहर 
           बोईसर, दि. ०१ : गोरगरीब नागरिकांचे जीवनमान उंचावेल असे प्रकल्प न देता बुलेट ट्रेन व एक्स्प्रेस हायवे सारखे प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने पालघर जिल्ह्यावर लादण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहेत. नरेंद्र मोदी देशातील जनतेची मन की बात जाणतात  मात्र पालघर जिल्ह्यातील  नागरिकांच्या मनातील असलेला प्रकल्पाला  विरोध जाणातील का असा असल्याचे शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.
             पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन व मुंबई – बडोदा द्रुतगती महामार्ग प्रकल्पाविरोधात शिवसेनेतर्फे शनिवारी ३० जून रोजी जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गोऱ्हे बोल्ट होत्या. या प्रकल्पामध्ये जमिनी जाणाऱ्या तलासरी तालुक्यातील 
 या पालघर च्या जनसंपर्क दौरा हा तलासरी कवाड, असा प्रश्न उपस्थित करतानाच हा विरोध आम्ही लोकशाही मार्गाने सरकारच्या कानांपर्यंत पोहोचवणार तालुक्यातील कवाड, डहाणू तालुक्यातील आंबेसरी व वनई, पालघर तालुक्यातील नांदोरे व सफाळ्यातील विराधन आदी गावात जनसंपर्क दौरा करून शिवसेनेच्या खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी येथील स्थानिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. प्रकल्पग्रस्त अनेक शेतकरी बांधवांनी ह्या प्रकल्पानाच्या विरोध दर्शवत हे प्रकल्प आमच्या फायद्याचे नाहीत. हे प्रकल्प आणताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. ज्या जमनीवर आमचा उदरनिर्वाह सुरु आहे. तो बलाढ्य लोकांकरिता बी अँड करण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. अश्या अनेक तक्रारी केल्या. तसेच जर तुम्हाला अहमदाबाद – मुंबई प्रवास अति जलद करायचा आहे तर विमानतळ निर्माण करा आणि हवी तेवढी विमाने आकाशातून उडवा. पण आमच्या जमिनी घेऊन आम्हाला विस्थापित करू नका. बुलेट ट्रेन व एक्स्प्रेस हायवे वर खर्च करण्यापेक्षा रेल्वेच्या सुविधांवर खर्च करा. आम्हाला शाळा रस्ते, महाविद्यालये, दवाखाने, पाणी हवे आहे, बुलेट ट्रेन नको, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
         या दौऱ्यात आमदार नीलम गोऱ्हेसह खासदार विनायक राऊत, आमदार पालघर संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, उदय पाटील, आआमदार अमित घोडा, पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, महिला संपर्क प्रमुख ममता चेंबुरकर, दीपा पाटील, ज्योती मेहेर, राजेश कुट्टे, वैभव संखे, कल्पेश पिंपळे तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनक सहभागी होते.  

comments

About Rajtantra

Scroll To Top