
वाडा, दि. ०१ : बहुजन विकास आघाडीचे तालुका सचिव व सामाजिक कार्यकर्ते अनंत (बंड्या) सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत चार तासात ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयातील रक्तपेढी विभागात या बाटल्या संकलित करण्यात आल्या असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. शिबिरास पालघर जिल्हा परिषदेचे उप-अध्यक्ष निलेश गंधे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर, उप-नगराध्यक्षा ऊर्मिला पाटील, बहुजन विकास आघडीचे तालुका अध्यक्ष अनंता भोईर, काँग्रेसचे दिलीप पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.