दिनांक 24 February 2020 वेळ 8:30 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या, पोलीसांच्या मुस्कटदाबीविरोधात आक्रमक भूमिका

पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकवटल्या, पोलीसांच्या मुस्कटदाबीविरोधात आक्रमक भूमिका

PATRAKAR ATAK-SAMANVAY SAMITI

राजतंत्र न्यूज नेटवर्क : दि. 01 : पालघर पोलीस स्टेशनमध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या आजतक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी राम परमार यांच्याशी गैरकायदेशीर वर्तन करुन उलट त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपाखाली कारवाई करणार्‍या पोलीस प्रशासनाच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील पत्रकार संघटना एकत्रित आल्या आहेत. काल पालघर येथे पार पडलेल्या सभेमध्ये हा लढा पुढे नेण्यासाठी पालघर जिल्हा पत्रकार समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

21 जून रोजी पालघर पोलीसांनी पालघर ते मनोर दरम्यानच्या वाघोबा खिंडीत कथीत दरोडेखोरांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे हुसेन आणि परमार हे पत्रकार पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तेथील पोलीस उप निरीक्षक तौफीक सैय्यद यांनी हुसेन हे चित्रीकरण करीत असल्याचा राग येऊन त्यांना शिवीगाळ केली. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी हुसेन यांचा मोबाईल जप्त करुन त्यांना कोठडीत डांबले. याबाबत राम परमार यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेही ऐकले नाही. उलट त्यांनाही केसमध्ये अडकवून आरोपी केले.

पोलीसांच्या अशा दडपशाहीच्या विरोधात पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, पालघर जिल्हा पत्रकार संघ, प्रेस क्लब ऑफ वसई विरार, वसई विरार महापालिका पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन अशा संघटना एकत्रित येऊन त्यांनी पालघर जिल्हा पत्रकार समन्वय समिती स्थापन केली आहे. ही समिती अधिक आक्रमकपणे हा प्रश्‍न पुढे नेणार आहे.

 • समितीच्या प्रमुख मागण्या अशा आहेत:
  > पोलीस उप निरीक्षक तौफीक सैय्यद आणि पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना तात्काळ निलंबित करा.
  > हुसेन खान आणि राम परमार यांच्यावरील आयपीसी 353 कलमान्वये लावलेला आरोप मागे घ्यावा.
  > पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांची बदली करावी.
 • 6 जुलै रोजी जेल भरो आंदोलन:
  पोलीसांकडून भारतीय दंड संहितेचे कलम 353 अधिक कठोर करण्यात आले आहे. त्याचा पोलीसांकडून गैरवापर केला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे हा कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 6 जुलै रोजी पत्रकार मोठ्या संख्येने पालघर पोलीस स्टेशनमध्ये वार्तांकन करण्यासाठी जातील आणि वार्तांकन हा गुन्हा असेल तर स्वतःला अटक करुन घेतील.
 • चलो नागपूरचा नारा :
  पालघर पोलीसांनी केलेल्या अधिकाराच्या दुरुपयोग प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांतर्फे नागपूर येथे अधिवेशन चालू असताना चड्डी बनीयनमध्ये निदर्शने केली जाणार आहेत. राम परमार यांना कपडे बदलण्याची संधी न देता पोलीसांनी त्यांना नेसत्या कपड्यानिशी पहाटे घरातून अटक केल्याचा निषेध म्हणून हे चड्डी बनियान आंदोलन केले जाणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top