दिनांक 12 December 2019 वेळ 10:34 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेतील रेल्वेच्या हद्दीतील रस्ता खचला

अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेतील रेल्वेच्या हद्दीतील रस्ता खचला

DAHANU RASTAशिरीष कोकीळ/डहाणू, दि. 29 : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे डहाणू पूर्वेला असलेल्या 5 नंबरच्या रेल्वे लाईनजवळ सिमेंटचा रस्ता खचला आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याशेजारी असलेला लोखंडी संरक्षक कठडा देखील पडला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

डहाणूत लोकलची उपनगरीय सेवा सुरू झाली त्यावेळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला 5 नंबरच्या रेल्वे लाईनजवळ सिमेंटचा रस्ता, त्याला लागूनच सिमेंटच्या चौकोनी ठोकळ्यांवर बसविण्यात आलेला लोखंडी संरक्षक कठडा तयार करण्यात आला. या कठड्याला लागूनच डहाणू पूर्वेकडील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पूर्वापार असलेला नाला आहे. लोकलने प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक ज्यांना जिना चढण्याचा त्रास होतो ते रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने या रस्त्याचा वापर करुन सरळ प्लॅटफॉर्म गाठतात, व्यापारी वर्गालाही अवजड सामान लोकलमधून ने-आण करण्यासाठी हा मार्ग सोयीचा पडतो. तसेच कंकराडी भागात असलेल्या शाळांमधील विद्यार्थी व लोकलने प्रवास करणारे पूर्वेकडील बरेच प्रवासी याच रस्त्यावरुन प्रवास करतात. मात्र सध्या उद्भवलेल्या धोकादायक परिस्थितीमुळे हे सर्वच जण जिवावर उदार होऊन या रस्त्याचा वापर करताना दिसत आहेत. एखादी मोठी दुर्घटना होण्याआधीच रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top