दिनांक 15 November 2018 वेळ 3:12 AM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा

बुलेट ट्रेनविरोधात शिवसेनेचा उद्यापासून जनसंपर्क दौरा

BULLET TRAIN-UDDHAVवैदेही वाढाण/बोईसर : पालघर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्ग प्रकाल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने पालघर जिल्ह्यामध्ये जनसंपर्क दौरा आयोजित केला असुन त्यानुसार उद्या, 30 जुन रोजी तलासरी तालुक्यातील कवाडा येथून या दौर्‍याला सुरुवात होणार आहे.
बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गासाठी पालघर जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी बांधवांच्या जमिनी जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 114 गावांमधून बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादन होणार असून पालघरमधील जनतेचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पाविषयी बाधित भूमीपुत्रांचे मत जाणून घेण्यासाठी तसेच या प्रकल्पाविषयी शिवसेनेची भूमिका जण माणसापर्यंत पोहचविण्यासाठी या जनसंपर्क दौर्‍याचे आयोजन केले असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.
या दौर्‍यात शिवसेनेचे नेते तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खाजदार विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, पालघर संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार अमित घोडा, सह संपर्क प्रमुख केतन पाटील, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, महिला संघटक ममता चेंबूरकर व दीपा पाटील, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर व शिवसेनेचे इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top