दिनांक 17 July 2018 वेळ 11:23 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दुचाकींच्या अपघातात 1 ठार, 2 जखमी

दुचाकींच्या अपघातात 1 ठार, 2 जखमी

डहाणू, दि. 28 : कासा-सायवण रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल, 27 जुन रोजी कासा-सायवण रस्त्यावरील वाघाडी गावच्या हद्दीत हा अपघात घडला. एम.एच.04/सी.सी.9919 या क्रमांकांच्या दुचाकीवरुन भरधाव वेगात आलेल्या तरुणाने विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच.48/ए.जे.3992 या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडक देणार्‍या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असुन दुसर्‍या दुचाकीवरील दोघांना हातापायास व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान या अपघाताची कासा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेश गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर इसमाचे नाव समजू शकले नसून अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. 27 जुन रोजी 3.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात वाहनाने चिरडल्याने सदर इसमाच्या डोक्याचा चेंदामेदा झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी मनोर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top