दिनांक 21 October 2019 वेळ 3:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » हात नदीचे पाणी घरात शिरल्याने कोल्हे पाडा ग्रामस्थांचे नुकसान

हात नदीचे पाणी घरात शिरल्याने कोल्हे पाडा ग्रामस्थांचे नुकसान

MANOR KOLHEPADA GHARAT PANIनावीद शेख/मनोर, दि. 28 : सोमवारी, 25 जुन रोजी झालेल्या अतिवृष्टीत चिल्हार-बोईसर रस्त्यावरील खुटल गावातील कोल्हे पाडा येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरम्यान येथील घरामंध्ये पाणी शिरण्यास कारणीभूत ठरलेला पूल तातडीने हटविण्यात यावा याकरिता श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बोईसर-चिल्हार रस्ता रुंदीकरणाचे काम बिटकॉन कंपनीमार्फत सुरू आहे. रस्ता रुंदीकरणासाठी खुटल येथील हात नदीवरील जुना पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. नवीन पूल बांधताना वाहनांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून हा लहान पूल बांधण्यात आला होता. आता नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन, दोन वर्षांपूर्वी तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. मात्र पर्यायी पूल तसाच ठेवण्यात आला आहे. 25 जूनला झालेल्या अतिवृष्टीमुळे हातनदीच्या पात्रातील पाणी पर्यायी पुलामुळे अडकल्याने नदीकिनार्‍यावरील कोल्हेपाडा या आदिवासी बहुल वस्तीतील सात ते आठ घरात शिरले. त्यामुळे पावसाळ्यासाठी बेगमी करून साठवुन ठेवलेले भात, भाताचे कणगे, तांदूळ तसेच संसारोपयोगी सामान भिजले आहे. तर काही वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने पेरणी केलेले पीक देखील कुजल्याने शेतकर्‍यांचेही नुकसान झाले आहे. काही तासांच्या पावसाताच कोल्हेपाड्यातील घरामंध्ये पाणी शिरल्याने पुढे यापेक्षा मोठा झाल्यास ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोंढाण ग्रामपंचायतीने हा पूल हटवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात 2015 मध्ये पत्रव्यवहार केला होता, परंतु त्याची दखल घेतली नसल्याने हा प्रसंग ओढवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, खुटल पुलाजवळचा पर्यायी पूल तातडीने हटविण्यात यावा. ग्रामस्थांना आणि शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश वरठा यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांना एक पत्राद्वारे दिला आहे.

पूल तातडीने हटविण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात येतील.
महेश सागर, तहसीलदार, पालघर

पुलात वापरलेले पाईप पुन्हा वापरता यावे यासाठी पर्यायी पूल तोडण्यात आला नव्हता. उद्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर पोक्लेन मशीनच्या सहाय्याने पूल हटविण्याचे काम सुरू करण्यात येईल.
-सि. भगत, उप अभियंता, एमआयडीसी

comments

About Rajtantra

Scroll To Top