दिनांक 19 February 2019 वेळ 3:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री अभ्यासक्रमाचा प्रारंभ

दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री अभ्यासक्रमाचा प्रारंभ

????????????????????????????????????

राजतंत्र न्युज नेटवर्क  : पालघर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, टाटा समाज विज्ञान संस्था (मुंबई), लुपिन समुह, तारापूर आणि चेन्नई येथील स्कील फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहयोगातून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात फार्मास्युटीकल केमिस्ट्री या विषयाचा बॅचलर ऑफ वोकेशनल पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयात पार पडला. दांडेकर महाविद्यालयात भावी काळातील तज्ञ आणि कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा आशावाद लुपिन ह्युमन वेल्फेअर रिसर्च फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विजय कोठीवले यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

सदर अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून आठवड्यातील पाच दिवस लुपिन कंपनीमध्ये प्रात्यक्षिकांसाठी व एक दिवस सैध्दांतिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. हा अभ्यासक्रम पुर्ण करताना विद्यार्थ्यांना सात ते नऊ हजार रुपये विद्यावेतन प्राप्त होईल व अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर लुपिन तसेच इतर कोणत्याही औषध निर्मिती करणार्‍या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल, अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोठीवले यांनी यावेळी दिली. तर नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत, परंतु त्याला साजेसे मनुष्यबळ निर्माण करणार्‍या अभ्यासक्रमाची वानवा आहे, अशी खंत कार्यक्रमास उपस्थित असलेले चेन्नई येथील स्कील फाऊंडेशनचे संचालक ईश्वर मूर्ती यांनी बोलून दाखवली. म्हणून सदर अभ्यासक्रम हा या परिसरातील विद्यार्थ्यांना उपयुक्त असून त्याचा रोजगार निर्मितीस हातभार लागणार आहे, असा विश्‍वास मूर्ती यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी यांनी भूषविले. लुपिन कंपनी आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी यांच्यामध्ये असेच सहयोगाचे संबंध वृध्दींगत होऊन विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे, अशी इच्छा त्यांनी अध्यक्षीय समारोहात व्यक्त केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, संस्थेच्या विश्वस्त माणकताई पाटील, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच लुपिन कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक भुपेश घरत व महेश काटे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिरीष पितळे आणि कोर्स समन्वयक डॉ. दिलीप यादव यांनी या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले. सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले 55 विद्यार्थी व महाविद्यालयातील इतर विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top