तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याला अधिक महत्त्व द्यायला पाहिजे – पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे 

0
10
IMG-20180627-WA0044प्रतिनिधी
             वाडा, दि. २७: वाडा पोलीस स्टेशनच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
            यावेळी बोलतांना वाडा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे म्हणाले कि, आजची तरुण पिढी वाईट संगतीमुळे, मित्र मैत्रीणीच्या दबावामुळे, कौटुंबिक अस्थिर वातावरण, अभ्यासाचा ताण, घरातील माणसाला असलेली अमली पदार्थांची सवय, पालक-पाल्यामध्ये सुदृढ संबंध नसणे इत्यादी कारणांमुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यातच बुडून राहतात व नंतर स्वतःचे आरोग्य धोक्यात आणतात किंवा गुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त होतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून आपल्या आरोग्याला अधिक महत्व द्यायला पाहिजे. 
         दरवर्षी २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने बुधवारी ( दि. २७ ) स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन व अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक बोऱ्हाडे, पोलीस उप निरीक्षक हरेश्वर धनगर, मुख्याध्यापक सुधाकर चौधरी, संस्थेचे सुरेंद्र खांडेकर, पोलीस नाईक शेळके, पोलीस कॉंस्टेबल नागेश निळ,  धानके, शिक्षकवृंद, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Print Friendly, PDF & Email

comments