जव्हारकरांसाठी धोक्याची घंटा, वाढत्या रहदारीमुळे जयसागर धरणातील पाणी दूषी होण्याची शक्यता

0
15
IMG-20180625-WA0079प्रतिनिधी
           जव्हार, दि. २५ : उंच ठिकाण वसलेल्या जव्हार भागात पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरीहि फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरात पिण्याच्या पाण्यासाठी जयसागर  धरणाचे पाणी हा एकमेव श्रोत आहे. मात्र धरणाशेजारी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रहदारीमुळे धारणामधील पाणी दूषित होवून येत्या काही वर्षात जव्हारकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होवू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 
जव्हार शहरातील १३ हजार लोकसंख्या जयसागर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. जव्हार भागात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होवून, एप्रिल, आणि मे महिन्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होते. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात या १३ हजार लोकसंख्येला जयसागर धरणातूनच पाणी पुरवठा केला जातो. अशी परिस्थिती असताना धारणालगतच्या कॅचमेट परिसरात वेगाने रहदारी वाढत असल्याने धरणातील पाणी दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. येथे यापूर्वीही अनेकांनी घरे, बंगले, व हॉटेल्स उभारली आहेत व सद्याहि नवीन घरे व इमारतींची बांधकामे चालू आहेत. धरणालगतच्या परिसरात वाढत जाणाऱ्या रहदारीमुळे या भागातून उत्सर्जित होणारे सांडपाणी थेट धरणातल्या पाण्यात मिसळून भविष्यात जव्हारकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल अशी भीती येथील नागरिकांना आता सतावत आहे.
कॅचमेट परिसर कासटवाडी  ग्रामपंचायत हद्दीत येत असून, येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी कॅचमेट परिसरातील सुरु असलेली बांधकामे थांबविण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत. मात्र तरीही बांधकामे सुरूच आहेत. यापूर्वी धरणालगतच्या वाढत्या रहदारीचा मुद्दा प्रसारमाध्यमांनी वारंवार प्रसारमाध्यमांच्या लक्षात आणून देऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि कासटवाडीच्या आणि सरपंचानी तात्काळ याप्रश्नी लक्ष घालून सुरु असलेले घरांचे व इमारतींचे बांधकाम त्वरित थांबवावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
कॅचमेट परीसरातील पाणलोट भागात सुरु असलेली हॉटेल व घराची बांधकामे थांबविण्यासाठी जव्हार नगरपरिषदेने कासटवाडी ग्रामपंचायतीला कळवूनही ग्रामपंचायतीकडून केवळ ठराविक बांधकामांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तर इतर बांधकामांना नोटीस बजावल्या नसल्याने ग्रामपंचायतीकडून अश्या बांधकामांना अभय देण्याचा प्रकार सुरू आहे मी नुकताच नगरपरिषदेचा पदभार स्वीकारला असून संबधित कर्मचाऱ्यांकडून याविषयी माहिती घेवून पुढील निर्णय घेतला जाईल.
प्रसाद बोरीकर-  
मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद

जयसागर धारण क्षेत्रातील खाजगी जागेत ज्या ईमारती व घरांची बांधकामे सुरु आहेत. अशी सर्व बांधकामे थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नोटिसा दिल्या आहेत.
मिलिंद गायकवाड –
ग्रामसेवक, काटसवाडी ग्रामपंचायत

Print Friendly, PDF & Email

comments