दिनांक 21 September 2019 वेळ 6:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाडा : अक्षयशक्ती ग्रुपच्या वतीने एकाच दिवसात एक लाख वह्यांचे वाटप

वाडा : अक्षयशक्ती ग्रुपच्या वतीने एकाच दिवसात एक लाख वह्यांचे वाटप

IMG-20180626-WA0025प्रतिनिधी
वाडा, दि. २६ : ठाणे स्थित अक्षयशक्ति ग्रुपच्या वतीने वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील तसेच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवसात सुमारे एक लाख वह्यांचे मोफत वाटप  करण्यात आले.
           मागील वर्षी देखील असाच उपक्रम राबवल्याने या ग्रुपची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये झाली होती. या वर्षी संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वसतिगृहातील विद्यार्थिनींना सुमारे आठ लाख रुपये खर्च करून शौचालय व स्वच्छता गृह बांधून देण्यात आले. तर आज वाडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव यांच्या पुढाकाराने व नियोजनाखाली एकाच दिवशी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना एक लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
          या प्रसंगी अक्षय शक्ती ग्रुपचे जसदिप लोणी, श्रीम विद्या, श्रीम मिनी सुबोध, गणेश काळे यांच्यासह फडके, जनेफळ सर, इतर शिक्षक वर्ग व विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेच्या सदस्यांसह वाडा तालुक्यातील केंद्र प्रमुख व शिक्षकांनी वह्या वाटप  करण्यासाठी विशेष मेहनत घेतली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top