दिनांक 21 February 2020 वेळ 11:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » लालोंढ्याच्या बालसुधारगृहातुन ११ मुलींचे पलायन

लालोंढ्याच्या बालसुधारगृहातुन ११ मुलींचे पलायन

IMG-20180626-WA0021राजतंत्र न्युज नेटवर्क
          मनोर, दि. २६ : मनोर पोलिस स्टेशन हद्दीतील लालोंढे गावातील रेस्क्यु फॉऊडेशन या बाल सुधार गृहातुन ११ मुलींनी कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना मंगळवार (दि.२६) पहाटे ४ वाजताच्या सुमारास  घडली. या घटनेबाबत दुपारी उशिरा पर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
          लालोंडे येथे रेस्क्यु फॉंडेशन नावाने महिला बाल सुधारगृह चालविले जाते. न्यायालयामार्फत अनैतिक व्यवसायात अडकलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांना या संस्थेत दाखल केले जाते. येथे त्यांना शिवणकाम, मेहंदी काढणे हस्तकला आणि व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. मागील तीन चार वर्षापासून या बाल सुधार गृहातुन मुलींच्या पलायन करण्याचं घटनांमध्ये वाढ होत आहे. महिनाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीने पलायन केले होते. त्या मुलीला बोईसर स्टेशनवर पकडण्यात आले होते.
           तर आज मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास ११ मुलींनी येथून पलायन केले आहे. मनोर पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top