दिनांक 30 May 2020 वेळ 8:44 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » विनवळ गावातील विहीर कोसळली, ग्रामस्थानपुढे पिण्याच्या पाण्याची अडचण.

विनवळ गावातील विहीर कोसळली, ग्रामस्थानपुढे पिण्याच्या पाण्याची अडचण.

IMG-20180624-WA0134प्रतिनिधी,
            जव्हार, दि. २५ : तालुक्यातील विनवळ गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर  शुक्रवारी रात्री पहिल्याच पाऊसात कोसळली. सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या विनवळकरांपुढे आता पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 
         विनवळ गावातील या सार्वजनिक विहीरीचे २५ ते ३० वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे विहरीच्या आजूबाजूला पाळीलगत  झाडे झुडपे वाढून झाडांची मुळे विहरीच्या बांधकामात घुसली होती. विहिरीची अवस्था पहाता ती कधीही कोसळेल अशी भीती येथील ग्रामस्थ आधीपासूनच व्यक्त करत होते. ग्रामपंचायत अंतर्गत विहीर दुरुस्तीचे कामही करण्यात आले होते. मात्र विहीर अधिकच दुरुस्तीला आल्यामुळे धोका निर्माण झाला होता. अखेर शुक्रवारी रात्री पहिल्याच पावसात विहीर कोसळल्याने ऐन पावसाळ्यात विनवळकरांपुढे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावाच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची दुसरी विहीर नसल्यामुळे येथील महिलांना ढाकपाड्यातील विहरीवरून किंवा इतर ठिकाणांवरील विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. दरम्यान विनवळचे सरपंच संदीप खुताडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाला याबाबत कळविण्यात आल्याचे सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top