दिनांक 17 July 2019 वेळ 3:52 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमधील रस्ते पाण्याखाली, पाण्यातून वाट काढताना नागरिकांसह वाहनचालकांचे हाल

बोईसरमधील रस्ते पाण्याखाली, पाण्यातून वाट काढताना नागरिकांसह वाहनचालकांचे हाल


IMG-20180625-WA0036वार्ताहर 
         बोईसर, दि. २५ :  मध्ये गेले दोन दिवस सतत च्या जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने  बोईसर मधील ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालक जीव मुठीत धरून वाहन चालवत आहेत. 
         गेले दोन दिवस सतत च्या पडणाऱ्या पावसामुळे बोईसर पालघर ररस्त्यावरील  सरावली जवळील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण झाले. तसेच बोईसर चिल्हार रस्त्यावरील बेटेगाव हद्दीत मोरीवरून पाणी वाहत असल्याने येथून प्रवास करणारे कामगार व वाहनचालक जीव मुठीत धरून वाहन हाकत आहेत . तसेच तारापूर एमआयडीसी मधील रस्त्यावर देखील पाणी साचल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे चांगलेच हाल झाले. तर लहान वाहने रस्त्याच्या मधोमध खराब होऊन झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. दरम्यान पूरस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने नाल्याशेजारी तसेच खाडीभागात राहणाऱ्या लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, अशी विनंती जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top