दिनांक 19 February 2019 वेळ 4:29 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » प्लास्टिक बंदी : बोईसरमध्ये ४ दुकानदारांवर कारवाई

प्लास्टिक बंदी : बोईसरमध्ये ४ दुकानदारांवर कारवाई

IMG-20180625-WA0043वार्ताहर
           बोईसर, दि. २५ : राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची बोईसर ग्रामपंचायतीकडून सोमवारपासून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्लास्टिक बाळगणाऱ्या ४ होलसेल दुकानदारांवर कारवाई करत प्रत्येकी ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पर्यावरणाचा विचार करून राज्यसरकार ने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी आणली आहे. राज्यभरात हा नियम लागू झाल्याने बोईसर ग्रामपंचायतीने जागोजागी प्लास्टिक बंदीचे फलक लावून त्यात प्लास्टिक बंदीबाबतची सूचना व दंडाची माहिती नमूद केली आहे. मात्र तरी देखील आज परिसरातील काही दुकानदार प्लास्टिकची पिशवी बाळगत असल्याने ग्रामसेवक कमलेश संखे यांनी अश्या ४ दुकानदारांना पकडून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांची दंड वसूल केला. यामध्ये प्लास्टिक होलसेलचे विक्रते व इतर होलसेल विक्रेत्यांचा समावेश आहे.

 

comments

About Rajtantra

Scroll To Top